


आपला भारत देश आज कोरोना विषाणू संसर्गाशी लढत आहे. महाराष्ट्र सरकारही फार चांगल्या रीतीने कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अश्या गंभीर परिस्थितीत प्रत्येकाने प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. असे मत व्यक्त करून अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीदिनी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यीक आणि हरित वसईचे प्रणेते सन्माननीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारातील 1,21,000 (एक लाख एकवीस हजार रुपये) रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्य निधी – कोविड 19 साठी वसई तहसीलदारांकडे सुपूर्द केला.
प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे फादर दिब्रिटो यांच्या विनंतीला मान देऊन वसई तहसीलदार श्री किरण सुरवसे यांनी मंडळ अधिकारी श्री कुमार होगडे यांना फादरांच्या घरी पाठवुन या धनादेशाचा स्वीकार केला.