

वसई(प्रतिनिधी) बहुजन महापार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष परेश घाटाळ यांनी विरार येथील कार्यलयात बहुजन विकास आघाडीचे पक्षाध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना लेखी स्वरूपात जाहीर पाठिंबा माजी सभापती निलेश देशमुख यांच्या उपस्थित देण्यात आले तसेच पालघर लोकसभा मध्ये काही तांत्रिक अडचण मध्ये परेश घाटाळ यांचे नामनिर्देशन रद्द करण्यात आले त्यामुळे जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी आणि विकासकामासाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना समर्थन देत आहे तसेच आमदार राजेश पाटील हे बोईसर विधानसभाचे आमदार म्हणून त्यांचे कार्य चांगले आहे तसेच अभ्यासूवृतीचे व्यक्ती असल्याने आणि पालघर जिल्हाच्या विकास कामे ते करूं शकतात म्हणून बहुजन महापार्टीचा पालघर जिल्हाध्यक्ष या नात्याने मी पाठिंबा देत आहे असे परेश घाटाळ यांनी सांगितले.