वसई (प्रतिनिधी)- वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा अंतर्गत मुख्य अग्निशमन केंद्र आचोळे तसेच इतर ५ उप अग्निशमन केंद्र, २२६ मनुष्यबळ व ३१ अग्निशमन वाहने सहित २४×७ कालावधीत तत्परतेने सेवा बजावीत आहेत.

नवघर पूर्व औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्या चालू आहेत. नवघर पूर्व रेल्वे स्टेशन लगत मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी पाहता सदर औद्योगिक वसाहतीमध्ये दुर्घटना झाल्यास अग्निशमन वाहन दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यास बराच कालावधी लागतो सबब औद्योगिक वसाहतीतील संस्थेची बऱ्याच वर्षापासून असलेली मागणी तसेच तत्परतेने आगीवर नियंत्रण, दुर्घटना तथा इतर घटना घडल्यास अग्निशमन यंत्रणा तत्परतेने पोहचून मनुष्य व वित्तीय संरक्षण करून तातडीने मदत मिळणे कामी मा.लोकनेते आमदार श्री.हितेन्द्रजी ठाकूर यांच्या निर्देशाने वसई विरार शहर महानगरपालिकेद्वारे औद्योगिक वसाहत नवघर, वसई पूर्व, येथे बांधण्यात आलेल्या अद्ययावत अग्निशमन केंद्राचा लोकार्पण सोहळा आज दि.१८/०९/२०२० रोजी दुपारी ०४.१५ वाजता मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.गंगाथरण डी., मा.माजी महापौर श्री.प्रवीण शेट्टी, मा.माजी महापौर श्री.नारायण मानकर, मा.माजी महापौर श्री.रुपेश जाधव, मा.माजी विरोधी पक्षनेते श्री.विनायक निकम, मा.माजी सभापती प्रभाग समिती ‘ड’ श्री.निलेश देशमुख, मा.माजी परिवहन समिती सभापती श्री.धनंजय गुप्ता व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *