फिरोज खान

वसई प्रतिनिधी : अजमेरचे ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती बाबत अपशब्द वापरुन बदनामी करणाऱ्या न्यूज 18चे अँकर अमिश देवगणचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खिदमतुल मुसलेमीत एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट पापडीचे अध्यक्ष फिरोज खान व मदरसा अहले सुन्नत मदीनातुल आराबिया ट्रस्टचे सचिव अजहर अहमद खान यांनी केली आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती हे सर्व धर्माचे कैवारी आहेत. सर्व धर्मजातीचे लोकत्यांच्यादारी आपल्या भावना मांडतात त्यामुळे लोकांना मनशांती मिळते.गरीब नवाज या नावाने त्यांना संबोधले जाते.सर्वधर्मीयांमध्ये ते गरीब नवाज या नावाने ओळखले जातात.त्यांच्यादारी मांडलेल्या प्रार्थना कबूल होतात.अशा गोरगरीब लोकांच्या दववसारखे मानले जाणारे ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्याबद्दल अपशब्द वापरून बदनामी करणाऱ्या न्यूज 18चया अँकर वर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी मदरसा अहले सुन्नत मदीनातुल आराबिया ट्रस्टचे सचिव अजहर अहमद खान व फिरोज खान यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *