
● भूमाफियांना मनपा अधिकारी खुलेआम अभय देत आहेत.
वसई (प्रतिनिधी) : वसई विरार महानगरपालिका (प्रभाग फ) भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी हिऱ्याच्या खाणीसारखी झाली आहे. पेल्हार प्रभागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांमधून मनपा अधिकारी पैसे गोळा करून स्वत:चे खिसे भरत आहेत, जाबर पाडा खैर पाडा मायकल कंपाऊंड वाकण पाडा सध्या भूमाफियांचा बालेकिल्ला आहे. छोट्या बेकायदा बांधकामांपासून मोठ्या बेकायदा बांधकामांपर्यंत लाखोंची वसुली करणारे भ्रष्ट अधिकारी आणि अतिक्रमण अधिकारी हितेश जाधव आता लाखो चौरस फूट बांधकाम सुरू झालेल्या कामातून कोटय़वधींची वसुली करत आहेत, मात्र मनपा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या प्रकरणी कानाडोळा करत आहे. आणि जर एका पत्रकाराने या भूमाफियांविरुद्ध तक्रार केली तर पालिकेतील भ्रष्ट व लाचखोर अधिकारी हितेश जाधव या कंत्राटी (ठेका) अभियंत्याने भूमाफियांना अनधिकृत विकासक यांना बोलावून पत्रकाराला मारण्याचा धमकवण्याचा सल्ला देतात तसेच या भूमाफिया आणि विकासकाना त्यांचा बांधकामांना संरक्षण देण्याचे काम मनपा अधिकारी करत आहे
आता पालिकेचे अधिकारी कंत्राटी अभियंता हितेश जाधव आपल्या प्रामाणिकपणाचा दाखला देणार का ? हे पाहायचे आहे.