
वसई तहसिलदार यांना भेटून विविध विषयांवर चर्चा
दलित पँथरचे वसई तालुका अध्यक्ष पँथर हरेश मोहिते यांनी वसई तहसिलदार यांची प्रत्येक्ष भेट घेऊन , नैसर्गिक अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात छोट्या मोठ्या उद्योजकांचे तसेच घाऊक किरकोळ धंदेवाईकांच्या दुकानात पावसाचे पाणी शिरून झालेले प्रचंड आर्थिक नुकसान तसेच शेतकऱ्यांचे भात पिकांचे झालेले प्रचंड आर्थिक नुकसाना बाबत गरीब गरजू धंदेवाल्यांना व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
राज्यात प्रचंड अतिवृष्टीने आस्मानी संकट आलेले असताना ,राज्यात अनेक ठिकाणी पूरर्जन्य परिस्थिती निर्माण होऊन प्रचंड जैविक व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.असंख्य कुटुबे पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन किंवा दरड कोसळून जिवंत गाडले गेले आहेत.भयानक परिस्थिती व संकट देशात आले असताना सरकार शर्तीचे प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहे. अनेक पक्ष व संघटना ,संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.
अचनक पणे निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या पालघर जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योजकांचे , घाऊक किरकोळ धंदेवाईकांचे तसेच शेतकऱ्यांच्या पीकपाण्याचे व शेतीमालाचे पावसाच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
आठवड्या पूर्वी झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी अनेक छोट्या मोठया दुकानांमध्ये शिरल्याने दुकानातील सामान पावसाच्या पाण्यात भिजून प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या आस्मानी संकटाच्या सामोरे जावे लागले आहे. करिता सदर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या छोट्या मोठ्या उद्योजकांचे तसेच घाऊक किरकोळ धंदेवाल्यांचे तसेच शेतकऱ्यांचे झालेल्या प्रचंड नुकसानाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वसई वैभव वृत्तपत्राचे संपादक तथा दलित पँथर वसई तालुका अध्यक्ष हरेश मोहिते यांनी केली.