

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिकेने अनधिकृत इमारतीच्या बांधकामात रुग्णालयाला परवानगी कशी दिली? सदरची परवानगी रद्द करण्याची मागणी शिवसेना नायगाव उप विभाग प्रमुख मायकल मोझेेेस आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार शहर महानगर पालिका अंतर्गत प्रभाग समिती जी हद्दीत नायगाव येथे जूचंद्र रोडवर गौरव विला या इमारतीत फिवर अँड ब्रेन मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल या रुग्णालयाला वसई विरार शहर महानगर पालिका प्रशासनाने कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. वास्तविक पाहता सदर रुग्णालय ज्या इमारतीत आहे ती इमारत बेकायदेशीर आहे. अशा इमारतीत रुग्णालयाला मान्यता दिलीच कशी? याची चौकशी व्हावी. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेना नायगाव उप विभाग प्रमुख मायकल मोझेेेस यांनी केला आहे.
फिवर अँड ब्रेन मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल या रुग्णालयाला मान्यता देताना नियम पायदळी तुडवित संबंधित अधिकाऱ्यांनी फार मोठा भ्रष्टाचार केला आहे. या रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर भरत दयालाल चौधरी हे भाईंदर येथे राहतात. ते अडचणीच्या व महत्वाच्या प्रसंगी आपली सेवा देण्यास तात्काळ उपलब्ध राहू शकतात का? तसेच रुग्णालयाला परवानगी मिळविताना ज्या आरोग्य सेविकांची यादी व अन्य तपशील दिलेला आहे त्या आरोग्य सेविका त्या ठिकाणी काम करीतच नाहीत. त्यामुळे या रुग्णालयाचा सर्व कारभारच बोगस आहे.
इमारतीला भेगा गेलेल्या आहेत. म्हणजेच ही इमारतच धोकादायक आहे.
सदर प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मायकल मोझेेेस यांनी केली असून त्यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांची भेट घेऊन सदर प्रकरणी त्यांच्याशी चर्चा केली असता सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे मायकल मोझेेेस यांनी सांगितले.