
नालासोपारा :- वसई विरार महानगरपालिकेच्या जी प्रभागातील मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या वालीव मधील धुमाळ नगर, नाईकपाडा, नायगांव येथील पाळणापाडा, चिंचोटी आणि बाफाने येथील पाळणापाडा याठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामावर बुधवार आणि गुरुवारी कारवाई करून अनेक अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आले आहे. या झालेल्या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त डी गंगाधरण आणि अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्या आदेशानुसार बुधवार आणि गुरुवारी जी प्रभागाचे सहायक आयुक्त सुभाष जाधव, अभियंता कौस्तुभ तामोरे, लिपिक विजय नडगे व इतर मजूर आणि कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहायाने कारवाई केली आहे. बुधवारी नाईकपाडा येथील सर्व्हे नंबर 66 मधील 3 हजार चौरस फुटाचे आरसीसीसी वीट पत्राशेडचे बांधकाम निष्काशीत करण्यात आले. धुमाळ नगर येथे पंधराशे फुटाचे बांधकाम निष्काशीत करण्यात आले. तर नायगावच्या पाळणा पाडा येथील 3 रूमचे बांधकाम निष्काशीत करण्यात आले आहे. गुरुवारी चिंचोटी येथील सर्व्हे नंबर 32 व 33 (कुरेशी कंपाऊंड) येथे 3 हजार चौरस फुटाचे विट पत्राशेडचे औद्योगिक गाळ्याचे बांधकाम व 7 हजार चौरस फुटाचे आरसीसी विट पत्राशेडचे औद्योगिक गाळ्याचे बांधकाम निष्काशीत करण्यात आले. तर चिंचोटी सर्व्हे नंबर 36 व 39 मधील 6 रूम व 10 प्लिथंचे बांधकाम निष्काशीत करणात आले. बापाने पाळणापाडा येथे 2 रूम तोडण्यात आल्याचे सहायक आयुक्त सुभाष जाधव यांनी पत्रकार ला सांगितले.