

सफाळा(राजेश चौकेकर) : सुनंदा एक माणुसकी ची भिंत पुरस्कृत अनुसया वाचनालयामार्फत सोमवार दि.१६/११/२० रोजी छोटी उचावली गावातील आदिवासी बांधवांसोबत मा. पोलीस अधिकारी संदीप कहाळे साहेब व व्यापारी इंदुमेल जैन यांच्या शुभहस्ते भाऊबीज साजरी करण्यात आली.
यावेळी आदिवासी महिलांना मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. अनुसया राजाराम सांगवेकर वाचनालयाचे अध्यक्ष संस्थापक दिनेश गुडेकर यांनी यावेळी उपस्थित योगराज वझे, जगदीश किणी सर यांचे ही आभार मानले. तसेच या कार्यक्रमाला ज्या ज्या व्यक्तींनी मदतीचा हातभार लावला त्या सर्व मान्यवरांची कृतघ्नता व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावकरी आदिवासी बांधव उपस्थित होते.