वसई : वसई विरार शहर महानगर पालिकेची स्थापना होवून जवळपास दहा वर्ष उलटली तर पालघर जिल्ह्याची स्थापना होवून ६ वर्ष झाले तरी देखील महानगर पालिका क्षेत्रासह पालघर वासियांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ तसेच आैषधींपासून रक्षण करण्यासाठी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका कार्यालयात कक्षच काय पण साधा अधिकार्‍याची देखील नियुक्ती केली गेली नाही.
अन्न व अौषध प्रशासन विभाग अस्तित्वात नसल्यामुळे वसई विरार शहरासह पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य रामभरोसेच आहे असे म्हणणे अतिशोयाेक्ती ठरणार नाही.
वसई विरार शहरात अवैध्य भेसळयुक्त तेल बनविणार्‍या कंपन्या, भेसळयुक्त माव्या पासून मिठाई बनविणारे कारखाने , शुध्द मिनिरल पाण्याच्या नावाखाली नागरिकांना अशुध्द पिण्याचे पाणी पुरविणार्‍या कंपन्या , अन्न व अौषध प्रशासनाची कोणतीही मान्यता न घेता , नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या या गल्लाभरू कंपन्यांविरोधात महानगर पालिका आरोग्य विभागात तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकांना सदरचे क्षेत्र आमच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात . तसेच अन्न व अौषध प्रशासनालय , ठाणे येथे तक्रार करण्याचा सल्ला देखील न चुकता देण्यात येतो.
पेल्हार विभागिय महानगर पालिका कार्यालयातील आरोग्य अधिकारी श्री. केदारे यांच्याशी संपर्क साधला असता , अन्न व आैषध प्रशासनाच्या कारभारात ढवळा ढवळ करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. तसेच अश्या कारखान्यांवर आम्ही कारवाई केल्यास , आमच्यावरच खंडणीचा आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आम्ही देखील केवळ सेनेटरीची कामं करण्यास प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केले.
आज शहरात होणारा पिण्याच्या पाण्याची कमतरता लक्षात घेवून संधीसाधू भांडवलदारांनी गल्लोगल्ली मिनिरल पाण्याचे प्लांट टाकून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ चालविला आहे.
एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करता एक सत्य तर नाकारता येत नाही की, आज घडीला वसई विरार शहर वासियांच्या आरोग्याची काळजी महानगर पालिकेने रामभरोसे सोडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *