वसई ( प्रतिनिधी )
इथे होणाऱ्या अन्याया विरोधी युवाशक्ती फाऊंडेशनी नेहमी वाचा फोढली होती, आणि अन्यायावर मात करुन लोकांना वेळोवेळी न्याय ही मिळवुन दिलाय.
याचा उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाग समिती आय वसईते वरिष्ठ लिपीक श्री. बाळाराम साळवी यांच्या कामाचे गैरवर्तन आणि स्वत:च्या पदाचा गैरफायदा घेवुन बाजारातील फेरीवाल्यांकडुन गैर पध्दतीत वसुली केली जात होती. याचा पाठपुरावा केल्यानी त्यांना निलंबित करण्यात आलेले, पण त्यांच्यावर पुढे काहीच कारवाई करण्यात आली नाही. जी. आर च्या प्रतिनुसार त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी तसेच साळवीने जो भ्रष्टाचार करुन महसुलची अफरातफर केली तो महसुल त्याच्याकडुन वसुल करण्यात यावा ही स्थानिक नेते व लोकप्रतिनिधींना विनंती आहे. या प्रकरणाला गंभिरपणे घेवुन योग्य ती कारवाई करावी.
आदिवासी जनसमुदाय हा आपल्या देशाचा व राज्याचाही अविभाज्य घटक आहे. आणि या आदिवासी बांधवांना वारंवार दुर्लक्षीत केल जातय. जवळपास ७-८ हजार लोकसंख्या असलेला इतका मोठा भाग सर्व मुलभुत सुविधा पासुन खुप दुर्लक्षित आहे. वेळोवेळी इथल्या स्थानिक आधिकारी व राजकीय पुढाऱ्यानकडे, नेत्यांकडे मदत मागुनही कोणी मदतीला पुढे येत नाहीये ही खंत आहे. हे आदीवासी बांधव रोजच्या जिवनात रस्ता, पाणी, विज , शाळा , बससेवा इतकच नव्हे तर गावात सार्वजनिक शौच्यालय नाहीत, बऱ्याच लोकांची नावे दारिद्रय खालील रेषा यादीतुनही वगळी आहेत.तसेच त्याच्या कडे रोजगार नसल्यांनी अत्यंत हालाकीत जिवन जगत आहेत. दरवेळी निवडणुका आल्या की या आदिवासी बांधवांना केवळ आश्वासन मिळतात आणि निवडणुक झाल्यावर कोणी डुंकुनही पाहत नाही , या सगळ्या परिस्थीतीला कंटाळून आज या सर्व ७०००/८००० बांधव या वेळच्या निवडणुक व मतदानावर बहिष्कार करत आहेत.
आमच्या मागण्या पुर्ण नाही केल्या तर आम्ही मतदान नाही करणार असे अारनांळा बोरीपाडा सभाळेपाडा इथल्या रहीवास्यांनी ठरवल आहे.
या सर्व प्रकरणात युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या सोबत यांच्या लढाईत सामिल आहोत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *