

आज दिनांक २० सप्टेंबर रोजी सातिवली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात अपंग जनशक्ती संस्था व युवा जनशक्ती ग्रुप , वसई अंधदुःख निवारण मंडळ पारनाका तसेच श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन तसेच हार्ट,ब्लड प्रेशर, ई. सी. जी(पूर्ण बॉडी चेक अप)., डायबिटीस ,रक्त तपासणी , कंबर दुःखी,सांधे दुखी,थंडी ,ताप,खोकला , सर्दी हे सर्व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.ह्या शिबिराचा २०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.ह्यावेळी रमेश घोरकाणा, शकुंतला शेळके, सुनील आचोळकर,लायन्स क्लब ऑफ वसई युनिक चे माजी अध्यक्ष सलीम मेमन,दीपक गौड,नारायण कुवरा,सारंग मित्र मंडळ चे अध्यक्ष राहुल आत्माराम घरत ,अपंग जनशक्ती संस्थेचे खजिनदार अशोक पुजारी, गोल्डन युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष किरण बनसोडे व कार्यकर्ते, सुनील किनी, नायकु देसाई , प्रमोद सावरकर, उज्वला कींनी , श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे राजेंद्र अंजारकार व डॉक्टर वर्ग ,वसई अंध दुःख निवारण मंडळ, पारनाका (वसई) डोळ्यांचे हॉस्पिटल चे कार्यकारी विश्वस्त मेघना कुलकर्णी, विश्वस्त खजिनदार अरुण चव्हाण ,विश्वस्त सचिव रवींद्र राऊत ,सचिव भार्गव चौधरी,विवेकानंद म्हात्रे व सातिवली येथील नागरिक उपस्थित होते.
अपंग जनशक्ती संस्थेचे तसेच युवा जनशक्ती ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले होते.व अपंग जनशक्ती संस्थेचे तथा युवा जनशक्ती ग्रुप चे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांच्या वाढदेिवसानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
हे शिबिर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी देवा ग्रुप चे तथा युवा जनशक्ती ग्रुप चे निलेश मोकाशी व देवा ग्रुप चे कार्यकर्ते , विनोद मधाले ,जितू जैस्वार,आई गावदेवी गोविंदा पथक चे निलेश कुवरा व कार्यकर्ते , प्रशांत साठे, ब्रिजेश जैस्वार , समाजसेवक नवनाथ जयवंत केंगार,प्रमोद धावणे, रवी उबाळे यांनी खूप मेहनत घेतली.
ह्या शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ वसई युनिक चे अध्यक्ष सुरेश काळे, सलीम मेमन , उज्वला कीनी, देवा ग्रुप चे तानाजी मोरे , निलेश मोकाशी व कार्यकर्ते, सारंग मित्र मंडळ चे राहुल आत्माराम घरत, आई गावदेवी गोविंदा पथक चे निलेश कुवरा , गोल्डन युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष किरण बनसोडे व कार्यकर्ते, रेनबो सर्व्हिसेस चे विजय तीकोने ,विदर्भ युवा संघटनेचे अध्यक्ष प्रमोद सावरकर व कार्यकर्ते ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.