

बहुजन महापार्टीने महाराष्ट्रामधील 135 मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे सदर यादीमध्ये वसई विधासभेमधून इच्छुक उमेदवार असे मन्सूर सरगूरोह यांचे नाव आहे. यांच्या बाबतीत सांगावयाचे म्हणजे त्यांनी केलेली कार्य खालील प्रमाणे
मन्सुर सरगूरोह हे मूळ कोकण पुत्र असुन कोकणाच्या संस्कृतीशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.त्यांचे शिक्षण इंग्रजीमध्ये झालेली असुन त्यांनी त्यांनी M.A.केलेले आहे त्यांनी परदेशात पत्रकारिता केल्याने त्यांना समाजाची चांगली जाण आहे.पत्रकार असल्याने समाजाशी निगडीक असल्याने समाजाचे प्रश्न ते चांगल्या प्रकारे माहीत आहे ते नेहमी जनतेच्या संपर्कात असल्याने ते येथील नागरिकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवू शकतात.वसई विधानसभा हा निसर्ग सहित संस्कृतीपूर्ण विधानसभा आहे.या विधानसभेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.त्यामुळे या मतदार संघात सुशिक्षित उमेदवाराची गरज आहे.मन्सूर सरगुरोह हे दुबईत ” खलिझ टाईम्स ” या वृत्तपत्र पत्रकार म्हणुन काम केले. पुढे १९९० ते पुन्हा स्वगृही भारतात येवुन ” टाईम्स आॅफ इंडीया ” मध्ये पत्रकारिता केली. पुढे समाजकारणाची आवड व समाजसेवा जपण्यासाठी त्यांनी २००९ मध्ये स्वत:चे इंग्रजी साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले जे आज तागायत ” कोकण सन ” या नावाने सुरु आहे . मन्सूर सरगुरोह हे ठाणे जिल्ह्यात कार्यरत असताना भारतीय जनता पक्षात त्यांनी कामे करत असताना भाजप पक्षाध्ये मुस्लिम समाजातील लोकांची कामे होत नाही तेथे मान सम्मान नाही तसेच भाजप हा जातीयवादी पक्ष आहे हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदर पक्षामधुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या सर्व लोकांना सोबत घेवून बहुजन महा पार्टीत जाहीर प्रवेश केला.बहुजन महा पार्टीत जाहीर प्रवेश झाल्यानंतर सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी झटत राहिले त्यांचे कार्य व जनतेमधील त्यांचा असलेला संपर्क पाहून वसई विधानसभेमधून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मन्सूर सरगूरोह यांना उमेदवारी मिळाल्यास एक पत्रकार होणार आमदार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.