

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . सुशांतने कशामुळे आत्महत्या केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही . तो ३४ वर्षांचा होता .सुशांत सिंह ने टिव्ही मालिकेतून सिनेसृष्टीत एट्री घेतली होती. त्यानंतर २०१३ मध्ये “ काई पो छे ” या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केल होत .
या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता . ‘ एम . एस . धोनी : द अनटोल्ड स्टोरी ‘ या टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीवर आलेल्या बायोपिकमध्ये त्याने धोनीची व्यक्तीरेखा साकारली होती
‘ शुद्ध देसी रोमान्स ‘ , ‘ डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी ‘ , ‘ छिछोरे ‘ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत .अमिर खानच्या सुपरहिट चिञपट ‘पीके’ मध्ये सुशांत सिंह यांनी छोटी भुमिका असलेले पाञ सरफराज यांची भूमिका अतिशय दमदार अभिनयातून साकारली होती. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे