
प्रतिनिधी : प्रभाग समिती आय हद्दीतील अमन पैलेस या इमारतीवरील अवैध मोबाईल टॉवर प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदर इमारतीचे सचिव व मोबाईल टॉवर कंपनीला नोटीस बजावण्यात आली. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील अमन पैलेस या इमारतीवरील अवैध मोबाईल टॉवर प्रकरणी प्रभाग समिती कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदर इमारतीचे सचिव व मोबाईल टॉवर कंपनीला दि. ३/११/२०२१ रोजी कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. नोटीसमध्ये कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी दिला नसला तरी नोटीस मिळताच तात्काळ कागदपत्रे सादर करावीत असे म्हटले आहे. कागदपत्रे तर सादर केली गेली नसणारच. प्रभाग समितीने सदर प्रकरणी अद्याप पर्यंत पुढे कोणतीही कारवाई केलेली नाही. कारवाई का केली नाही, सहाय्यक आयुक्त प्रदीप आवडेकर यांनी सदर प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याचे समजते. त्यामुळेच सदर प्रकरणात कोणतीही कारवाई होत नाही. आयुक्तांनी सदर प्रकरणी चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.
