
★अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. च्या कामगारांचा संप!
★ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकवटणार संस्थेचे कामगार!
‘धडक कामगार युनियन’च्या ‘अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या.’ युनिट च्या कामगारांनी संस्था प्रशासनाकडून वारंवार होत असलेल्या अन्याया विरोधात धडक कामगार युनियनच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 31 ऑक्टोबर 2022 रोजी पासून संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
वेळेत न दिला जाणार पगार… तसेच मागील 2 वर्षांपासून रखडलेली पगारवाढ! आदी विविध मागण्यांसंदर्भात कामगारांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. च्या कामगारांनी मागील वर्षापासून धडक कामगार युनियचे प्रतिनिधित्व स्वीकारले असून युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संप होणार आहे. मागील 2 वर्षांपासून रखडलेलेल्या पगारवाढी संदर्भात संस्था प्रशासनाने एक वर्ष फक्त कोरोनाच्या नावाखाली तर 2 दुसरे वर्ष चालढकल करण्यात काढली. त्यानंतर युनियनने अनेकवेळा बैठक घेऊन अखेर 4,000 पगारवाढ मान्य केली होती त्यानंतर अचानक 2,000 पगारवाढ घेण्यास संस्था प्रशासनाकडून दबाव टाकण्यात आला. याबाबतीत कामगारांनी एल्गार पुकारला असून “जिंकू किंवा मरू! पण आमचे हक्क घेऊ!” अशी घोषणा दिली आहे.