
कोरना च्या पार्श्वभूमीवर गेले जवळजवळ पाच महिने बंद असलेली अर्नाळा डेपो ते वसई बस डेपो ही प्रवाशांची जीवन वाहिनी बंद होती. त्यामुळे उत्तर वसई आणि दक्षिण वसईतील अनेक गावातील प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती. ती सेवा सुरू व्हावे म्हणून मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष श्री मिलिंद खानोलकर व शिवसेना वसई उप-तालुका प्रमुख ॲड. अनिल चव्हाण यांनी राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. परिवहन मंत्री, मा. पालकमंत्री आणि संबंधितांना लेखी निवेदनाद्वारे विनंती केली होती.
सदर विनंती शासन व प्रशासनाने मान्य केली असून गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट २०२० पासून सकाळी एक व दुपारी एक अशा फेर्या सुरू करण्यात येणार असून प्रवाशांची संख्या व मागणी नुसार ते वाढविण्यात येणार असल्याचे एस. टी. महामंडळाचे जिल्हा नियंत्रण श्री जगताप यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव साहेब ठाकरे, मा. परिवहन मंत्री अनिल परब साहेब व सर्व संबंधित प्रशासनाचे वसईकर प्रवासी जनता आभारी आहेत.
