
विज बिल माफ करा नाहीतर आत्महत्या करीन – महिलेचा ईशारा

अर्नाळ्यातील आदिवासी महिलेला महावितरण विभागाच्या डिसाळ कारभाराचे उदाहरण विरार अर्नाळा गावातील शंकर पाडा राहणार्या महिलेला चक्क चार लाख ३७ हजार ४८० रुपयांचे एका विज देयक आले होते. मात्र ह्यावर लाल बावटा पक्षाने महावितरणच्या अधिकाऱ्यांनशी बोलुन कमी करण्यासाठी सांगितले होते.मात्र उलटच झाले. आता चार लाख ४१५८० रुपये विज विल आले आहे. यामुळे महिलेच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोणा काळानंतर विज देयकातील गोंधळा कारभार थांबताना दिसत नाही. सामान्य नागरिकांना वाढिव विजबिलाचा प्रकार वाढतच आहे. भर लाॅकडाउन मधे अनेक वेळा लाल बावटा पक्षाने आंदोलन देखील केली. आणी स्वतावर गुन्हे दाखल करुन घेतले. सरकार ने लोकांनची फसवणूक केली.आधी सांगीतले की विज बिल माफ करू आणि मग सक्रतीने विज बिल वरुली करण्यात आली. ह्या संदर्भात वसई चे आमदार हितेंद्र ठाकूर ह्यानी देखील ढोंगेचे सोंग घेतले होते. मी बील भरणार नाही. तुम्ही देखील भरू नका. असे म्हणनारे आमदार कुठे गेले असा संताप आता लाल बावटा पक्षाने वसई तालुका सचिव काॅम्रेड शेरू वाघ ह्यांनी व्याक्त केला आहे. त्याच बरोबर माझे बिल माफ करा नाहीतर आत्महत्या करीन असा इशारा आदिवासी महिलेने दिला आहे