
मागील काही महिन्यात महाराष्टात काही जातीवादी संघटनानी महारष्ट्राचे वातावरण दुषित केले असुन, महारष्ट्रात धर्म सभेचे नावावर, लव जिहाद च्या नावावर समाजात द्वेष निर्माण केले असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे जागो जागी दोन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगल होत असल्याचे दृश्य पूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. नंदुरबार ,अकोला कोल्हापूर, औरंगाबाद, अमळनेर जालगाव, शेवगाव अहमदनगर, संगमनेर असे अनेक ठिकाणी जातीय तेढ निर्माण होऊन दंगली झाल्याचे याचे कारण एकच की सरकार द्वेष पसरविणारे जातीवादी संघटनेवर कारवाई करण्यास असमर्थ असल्याचे दिसत आहे. आपण सर्व दंगली पाहिल्यास त्यात स्थानिक पोलिसांची भूमिका ही संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. शेवगाव अहमदनगर येथे झालेल्या दंगलीत पोलीस प्रशासनाची उपस्थितीत मशिदिवर हल्ला करण्यात आले. तसेच संगमनेर येथे धर्म सभेचे अगोदर व नंतर काही जातीवादी संघटनानी मुस्लिमांच्या घरावर तसेच दुकानावर हल्ला करून तेथील मुस्लीम अल्प्संख्याक समाजाला जीवे मारण्याचे प्रयतन करण्यात आले. तसेच नंदुरबार येथे अवैध सटटा पीढीत झालेल्या वादावरून झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीत ६४ पैकी फक्त मुस्लीम समाजाचे ५७ आरोपी करण्यात आले, तसेच अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी झालेल्या दंगलीत सुधा ६१ पैकी ५७ आरोपी हे मुस्लिम समाजाचे कण्यात आले.
तसेच अमळनेर पोलीसांच्या कस्टडीत अश्पाक सलीम शेख या माजी नगरसेवक पुत्राला पोलिस कोठडीतुन मॅजिस्ट्रेट कोठडीत येताच दिवशी जीव गमवावा लागला, बीड जिल्ह्यात सुधा चोरीच्या संशयाने एका मुस्लीम व्यक्तिसअटक करून बेदम मारहाण करण्यांत आली आणि पोलीसांच्या मारहाणीमुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. या सर्व गोष्टी बघता मुस्लीम अल्पसंख्यांक समुदायची शासना तर्फे व इतर तथाकथित जातीयवादी संघटना द्वरा मुस्कटदाबी करून गडचेपी होत असल्याचा चित्र दिसून येत आहे आणि सदर प्रकारामुळे समाजात संतापाची लाट पसरलेली आहे व पुढे बकरी ईद सारखा मोठा सन देखील साजरा होत असल्याने पोलासनी दुटप्पी भूमिका ना साकारता अल्पसंख्यांक समुदायला संरक्षण देणे गरजेचे आहे तरी आपणास विनंती की आपण अल्पसंख्यांक समुदायाला योग्य तो न्याय मिळून देणे कामी योग्य कार्यवाही होणे गरजेचे असुन आपल्या स्तरावरून मांडण्यात यावी म्हणून अल्पसंख्यक विकास मंडळ चे संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएब खाटिक, अमीन शेख व मन्नान शिकलीगर यांनी सदर निवेदन दिले.