

प्रतिनिधी
वसई, दि. 24 : आगरी सेना पालघर जिल्हा सचिव पदावरून अनिकेत वाडिवकर यांची गच्छंती करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या आगरी सेनेच्या पुनर्बांधणी तसेच जिल्ह्यात आगरी सेनेचा प्रभाव वाढवण्यासंबंधी झालेल्या मेळाव्यात आगरी समाजातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांना विविध पदांवर नियुक्त करण्यात आले होते. या नियुक्तींदरम्यान, अनिकेत वाडिवकर यांना आगरी सेना जिल्हा सचिव या प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले होते, परंतु अनिकेत वाडिवकर आपल्या पदाचा गैरवापर करून आगरी सेनेच्याच कार्यकर्त्यांना अडचणीत आणत असल्याची तक्रार आगरी सेनेकडे आली होती. तसेच पोलीस अधिकार्यांशी संगनमत करून आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांनाच नाहक त्रास देत असल्याचेही आगरी सेनेचे म्हणणे आहे.
या सगळ्या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊनच अनिकेत वाडिकर यांना जिल्हा सचिव पदावरून बडतर्फ करण्यात येत असल्याची माहिती आगरी सेनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.