प्रतिनिधी : गुरूवार दि. १५ आँगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून युवा विकास आघाडी (आगाशी) व जयभिम मित्र मंडळ (आंबेडकर नगर, आगाशी) यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीरात आगाशी विभागातील अनेक नागरिकांनी रक्तदान केले. सदर शिबीर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सभागृह (आगाशी) विरार (पश्चिम) येथे सकाळी ९.०० ते सांयकाळी ठिक ५.०० वाजेपर्यंत सुरू होते. शिबीरात अनेक संघटना, सामाजिक संस्था गावातील ग्रामस्त महिला तरूण यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. स्थानिक नगरसेविका सौ. सुषमा लोपीस तथा वसई पश्चिम विभागातील कार्यरत असलेली भिम प्रेरणा जागृती संस्था यांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिबीर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी युवा विकास आघाडी व जयभिम मित्र मंडळ आंबेडकर नगर यांच्या सर्व महिला, तरूण कार्यकत्यांनी मोलाचे योगदान दिले. आलेल्या सर्व पाहुण्याचे पाहुणे, मान्यवर, पत्रकार यांचे आभार प्रभाकर वागळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *