नालासोपारा(प्रतिनिधी)-नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथील एका नवीन शर्थीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम प्रकरणी वसई तहसीलदारांनी प्रांताला कारवाईचे आदेश जारी करत निष्कत्मक कारवाई करून सदर जागा शासन जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.विशेष म्हणजे पालिकेच्या तीन स्मरणपत्रांनंतर महसूल विभागाने कारवाईसाठी हालचाली करताना चार वर्षांनंतर प्रांताला कारवाईचे निर्देश दिले आहेत.पालिका हद्दीतील मौजे आचोळे सर्व्हे सर्वे नं.२५१ ही.३ या नवीन शर्थीच्या जागेवर गेल्या ४ वर्षांपासून दोन अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. असे असतानाही आजपर्यंत याठिकाणी कोणतीही स्वरूपाची कारवाई झाली नाही. येथील भूमाफिया अनधिकृतपणे बांधकाम करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत.सदरची फसवणूक टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व महसूल विभागाचे अधिकारी हे एकत्र येऊन सदरचे अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्कासित करावे अशी आमची मागणी आहे असे बहुजन महापार्टीचे जिल्हाध्यक्ष परेश घाटाळ यांनी आमच्या प्रतीनिधीशी बोलताना सांगीतले आहे.परेश घाटाळ यांनी सदरच्या अनधिकृत इमारतीवर कारवाई व्हावी यासाठी राज्याचे महसूलमंत्री, नगरविकास मंत्री, पालघर जिल्हाधिकारी व आयुक्त वसई विरार मनपा यांच्या कार्यालयात दाखल केली आहे.वरील प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला असल्याचे बहुजन महापार्टीचे जिल्हाध्यक्ष परेश घाटाळ यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *