शिवसेना पालघर जिल्हा सचिव श्री.मिलींद खानोलकर महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या उप आयुक्त श्री.प्रदीप जांभळे पाटील यांची त्यांच्या दालनात वाढीव घरपट्टी संदर्भात कार्यकर्त्यासह भेट घेतली होती. महापालिकेने ग्रामीण करधारकांवर बेकायदेशीरपणे महापालिका कायद्यातील करावधान नियमावलीचा अवलंब न करता घरपट्टीच्या दरांमध्ये प्रचंड वाढ केलेली आहे. उप आयुक्त श्री.प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे घरपट्टी हा विभाग कार्यरत असल्यामुळे सदरहू विषयात संघटनेने महापालिकेस लिहिलेल्या घरपट्टी संदर्भातील पत्रास त्यांनी पत्राद्वारे संघटनेस पत्राच्या मुद्द्याला बगल देत आणि पत्रात नमूद संदर्भाबाबत संदर्भहीन उत्तर दिले होते त्याबाबत खुलासा घेणेकामी तसेच करदात्यांची बाजू मांडणे हा भेटी मागचा उद्देश होता.
लोकसेवक असून सुद्धा ते शिवसेना जिल्हा सचिव श्री.मिलींद खानोलकर हे सांगत असलेल्या मुद्द्यांबाबत कोणतेही स्पष्टीकरण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. स्वता:स अगाध ज्ञान असल्याच्या तोऱ्यामध्ये ते प्रत्येक मुद्द्यामध्ये हुज्जत व वाद घालण्याची त्यांची मानसिकता दिसून येत होती. चर्चा सुरु असताना अचानक त्यांनी आपला पवित्रा बदलला आणि ते सांगू लागले की, मला मायग्रेनचा त्रास असल्याकारणाने मी तुमचा आवाज ऐकु शकत नाही. यामुळे विषयावरील संवाद संपला.
उप आयुक्त श्री.प्रदीप जांभळे पाटील यांना मायग्रेनचा गंभीर आजार असल्यामुळे त्यांची संबंधित शासन मान्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तपासणी करून घेऊन त्याचा तपासणी अहवाल प्राप्त करून घ्यावा आणि शासकीय नियमावलीप्रमाणे आजाराचे प्रमाण जास्त असल्यास तो आजार बरा होईपर्यत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. तसेच उप आयुक्त श्री.प्रदीप जांभळे पाटील यांचा करदाता नागरिकांशी नियमित संबंधित येत असल्यामुळे आणि त्यामुळे त्यांना असलेले आजारपण हे कधीही उद्भवणारे असल्याने त्यांची तात्काळ त्या पदावरून बदली करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या आणि मी वसईकर अभियानाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त श्री.गंगाधरन डी. यांच्याकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *