
आज वसई तहसील आवारात मध्ये सकाळीच दलालची रेलचेल पुन्हा सुरू झाली आहे, गेल्या बातमी मुळे काही दिवस दलाल दिसत नव्हते मात्र पुन्हा दलाल आता सायंकाळी ऐवजी आता सकाळी दलाल येत आहे म्हणजे दलाल यांनी आपले फक्त वेळा पत्रक बदल केले आहे.
तसेच वरिष्ठांना अधिकारी याना नेहमी निदर्शनास आणून दिले आहे मात्र तरी पण जमिनीची कामे (एन.ए) ची कामे इत्यादी. इतर काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलाल वसई तहसील च्या आवारात फिरत आहे आहे, वसई तहसील जणू भ्रष्टाचाराचे अड्डा तयार झाले आहे.
दर दहा ते पंधरा दिवसांनी तहसील कार्यालय मध्ये मोठ्या प्रमाणात दलाल दिसत आहे, जनतेला प्रश्न पडलेला आहे की दलाल शिवाय तहसील चे काम चालणार आहे की नाही ? जास्ती करून जनतेची कामे दलाल मार्फत केले जाते. त्यामुळे जनतेची कामे रखडत आहे व दलालची कामे सुरळीत चालत आहे .
तसेच पुढील बातमी मध्ये दलालची फोटो व नाव आणि व्हिडीओ याची यादी जाहीर केली जाईल.