
६ जून रोजी संघटनेच्या वतीने वसई तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण व बिऱ्हाडी आंदोलन कण्यात आले होते.
त्यावेळी पंचायत समिती च्या संबंधित मागण्या संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व खाते प्रमुख पंचायत समिती वसई यांची संयुक्त सभा आठ दिवसाच्या कालावधीत दिनांक १७ जून रोजी आयोजित करून संबंधित मागण्या पुर्ण करण्याच्या दुष्टीने कार्यवाही करू असे आश्वासन पंचायत समिती कडून आदिवासी एकजूट संघटनेला देन्यात आले होते.
म्हणून दिलेल्या तारखीला व वेळेवर १७ जून सकाळी ११ आदिवासी एकजूट संघटनेचे अध्यक्ष कु शेरू वाघ सत्पाळा सांभाळे (आदिवासी पाडा) येथील गावकमेटी अध्यक सौ.पुनम भुयाळ, उपाध्यक्ष सौ.शोभना मोरे , खजीनदार सौ.
शोभा आडगे,व ईतर कार्यक्ते श्री.अरंविद भुयाळ ,कु.मनिषा हरपाले ,व ईतर अनेक कार्यकरते उपसतीत होते .
परंतु संघटनेला वेळ देउन वसई पंचायत समिती गटविकास अधीकारी हजर नवते.
त्यानंतर पंचायत समितीच्या अधीकारांना संघटनेच्या अध्यक्षांनि जाब विचारला कि गटविकास अधीकारी साहेब कुठ आहेत.आज आम्हाला पत्र देउन बोलावल होत. सभेसाठी .
पंचायत समितीच्या अधीकार्यानकडून उत्तर मिळाले. साहेब आज काही कारना मुळे बाहेर गेले आहेत.
तरी तुम्हाला साहेबांनि पुढची तारीख द्यायला सांगीतली आहे तुम्ही २४ जून रोजी सकाळी ११ वाजता हजर राहा .
त्या वेळी संघटनेच्या महिला कार्यकर्ती यान्ही मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला .
आम्ही आदिवासी आहोत .शेतमजूर आहोत .आम्हाला काय कामधंदा नाय का ?
असे प्रश्न महीलांनी विचारले .
आम्हाला लेखी पत्र द्या .
आनि पुन्हा जर आमची फसवनुक केली तर आम्ही त्याच दिवशी आपल्या कार्यालयात धरणे आंदोलन करू .
होणार्या परीणामाला जबाबदार आपण राहाल .
असा ईशारा आदिवासी एकजूट संघटने च्या महीला कार्यकर्तीनंनि दिला ..

Barobar Ahe sanghtneche….Ashe Adhikaryanna Jaab Vicharla Pahijech..,