

वसई विरार शहर महानगर पालीकेच्या हद्दीतील विविध मागण्याकरिता दिनांक १६ सप्टेंबर रोजी विरार एसटी डेपो येथून जकातनाक्याच्या मार्गावरून ईशारा मोर्चा काढून थेट मनपा च्या मुख्य कार्यालयावर धडक देउन विविध प्रश्नांचे निवेदन आयुक्तांना देउन मागण्या मांडण्यात आल्या प्रतेक प्रश्नानवर सकारात्मक चर्चा झाली आयुक्ताकडून संघटनेला आश्वासन देण्यात आले की येत्या दहा दिवसात जे काही प्रश्न सुटण्या सारखे आहेत ते सोडवू बाकीचे प्रश्नांचे प्रस्ताव मनपाच्या वतीने पुढे प्रस्ताव पाठवू त्यावेळी आदिवासी एकजूट संघटने कडून मनपाच्या आयुक्तांना ईशारा देण्यात आला की जर आदिवासी एकजूट संघटनेची फसवणूक केली तर संघटना मनपा च्या कार्यालया ला टाळ लावो आंदोलन करेल मनपाच्या कार्यालयाला संघटना टाळ लावेल मग जेल मधे टाकल तरी संघटनेची तयारी जेलमधे जाण्यासाठी आहे असा मनपाला आदिवासी एकजूट संघटनेनी ईशारा दिला
मोर्चात आदिवासी एकजूट संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष कु. शेरू वाघ सचिव सौ पूनम भूयाळ उपाध्यक्ष सौ.दिपा माळी .उपाध्यक्ष सौ.काजल वरठा खजिनदार सौ.शोभा आडगे सदस्य जयेश कदम भावेश गींभल गीता राठोर दुर्गा गायकवाड मनिषा हरपाले सुमन वळवी कु.रवी दिवा तसेच आदिवासी एकजूट संघटनेची हजारो सभासद तसेच कार्यकर्ते मोर्चात सहभाग झाले होते…