आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ईशारा
वसई तालूक्यातील सर्व सामान्य जनतेच्या वतीने आदिवासी एकजूट संघटनेनी थेट उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले .निवेदनात वसई तालुक्यातील जनतेला भेडसवणारे प्रश्न मांडण्यात आले.
१) अतिवृष्टी व नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. मात्र निर्णयाची अमलबजावणी करणेकामी पंचनामे करण्याची जबाबदारी संबंधित तलाठी यांच्यावर सोपवली होती. एकीकडे पावसाने होत असलेल्या नुकसानीमुळे सामन्य जनता कष्टप्राय जीवन जगत होती. दुसरी कडे तलाठ्यांनी पंचनामे करण्याऐवजीजी गोठ्यात लोळत होते. वेळेवर पंचनामे न करता जागेवर न जाता वेळ निघून गेल्यावर तलाठ्यांनी घर बसल्या पंचनामे केले. पंचनाम्यात तलाठ्यांनी चुकीचा रिपोर्ट लिहिला. चूक अधिकाऱ्यांची मात्र त्या चुकीचे भोग सामान्य जनतेच्या वाटेला का? असा प्रश्न संघटनेनी अर्नाळाचे तलाठी श्री हेमंत मुळाणे यांना विचारल्यास मुळाणे यांच्याकडून संघटनेच्या पदाधिऱ्याना उत्तर मिळाले की, तुम्हाला वाटेल ते करा मी कोणाला घाबरत नाही.
म्हणून आज संघटनेनी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की तलाठ्याने केलेले पंचनामे चुकीचे आहेत. ते दुरूस्त करा व चुकीचे पंचनामे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा
२) वसई तालुक्यात आजही किती तरी आदिवासी शेतमजूर बांधवांकडे आधार कार्ड नाही. म्हणून प्रत्येक आदिवासी पाड्यात आधार कार्ड काढण्यासाठी शिबीर लावण्यात यावे.
३)सत्पाळा ग्रामपंचायत हद्दीतील संभाळे पाड्यात एकूण ४५ घरांची वस्ती आहे. पाड्यात एकही सार्वजनिक शौचालय नाही. एके बाजूने सरकार दावा करते की आम्ही देश हागणदारी मुक्त केला. मात्र हे दावे खोटे ठरले आहेत.
४)सत्पाळा सांभाळे तलावाला संरक्षक भिंत बांधण्या करीता ग्रामसभेत ठराव झाला आहे. तरी देखील संरक्षक भिंत बांधली जात नाही
५)वसई तालूक्याच्या पश्चिम पट्ट्याला हजारो आदिवासी आजही झोपडीत राहतात. शासनाने सर्वेक्षण करावे आणि घरकुलापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ द्यावा.
अश्या विविध मागण्यांचे निवेदन मा.निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव यांच्या पुढे मांडून प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आदिवासी एकजूट संघटनेचे अध्यक्ष कू.शेरू वाघ सदस्य सौ.कमळ भूयाळ व कॉ. आदेश बनसोडे यावेळी उपस्थित होते. जर आठ दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत. तर संपूर्ण पालघर जिल्यातील आदिवासी शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांना एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयात बेमूद्दत ठिय्या मांडून बसू, असा इशारा आदिवासी एकजूट संघटनेच्या वतीने शेरू वाघ यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *