वसई तालुक्यातील पश्चिम पट्टीत “बावखल” ही एक वेगळी ओळख आहे. विहीर आणि तलाव या मधला हा प्रकार आहे. बावखल म्हणजे pond हा इथल्या केळी, फुले, भाज्यांच्या वाडीला पाणी पुरवणारे, पिण्याच्या पाण्याची सोय करणारे राहिले आहेत.

हरित वसई विकासाच्या नावाखाली जसजशी भू माफिया, बिल्डर लॉबीच्या घशात घातली जात आहे तसतशी इथली बावखले ही बेकायदेशीरपणे बुजवून जमिनीवर कबजा मिळवण्याचे उद्योग वाढले आहेत.

वसईत, भुमि सेना आदिवासी एकता परिषद, तसेच पर्यावरण संवर्धन समिती आणि इतर सहयोगी संघटना संस्था ही वावखल वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आले आहे.

आता ही बावखल वाचवण्यासाठी झ्टणाऱ्या कार्यकर्त्यावर भू माफिया कडून हल्ले होऊ लागले आहेत.

आज संध्या. ५.१५ वा. लेंभाट आळी, गिरिज, वसई येथे ट्रक ने रॅबीट टाकून पाण्याचे स्त्रोत असलेले बावखल बेकायदेशीरपणें बुजवले जात होते. आदिवासी एकता परिषदचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष तसेच वसई तालुका अध्यक्ष मा. दत्ता सांबरे रस्त्याने जात असताना त्यांच्या हे निदर्शनास आले व ते या बेकायदेशीर प्रकाराचा फोटो काढत होते. दत्ता सांबरे बवखल वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवतात म्हणून भू माफियानी ठरवून जाणूनबुजून सांबरेवर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर गॅरेज मधील लोखंडी सामनाने प्रहार केला. दत्ता सांबरे हे आदिवासी समाजाचे असल्याने, आदिवासी समाज तसेच पर्यावरण रक्षणासाठी झटत असल्याने भू मफियानी ठरवून मारण्याच्या इराद्याने हल्ला केला.

भूमि सेना आदिवासी एकता परिषद या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते. हल्ला करणाऱ्या पर्यावरण विरोधी भू माफिया वर अॅट्रोसिटी कायद्याखाली तसेच पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही मागणी करतो. संबंधित आरोपींना अटक केली नाही तर बावखाल वाचवण्यासाठी, वसईचे पर्यावरण रक्षणासाठी भुमिसेना आदिवासी एकता परिषद तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देते.