
मुलीला वाचवण्याकरीता गेलेल्या बापाचा नराधमांनी मारुन मारुन अखेर घेतला जिवं

भिवंडी तालुक्यातील आंबाडी येथील स्थानिक रहिवासी भरत गोविंद दिवे.आदिवासी कातकरी समाजातील होते.ते रोजगाराच्या शोधात वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला रोड येथे गेल्या दोन महिन्यांपासून मजुरी करून स्वताचे व कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होते.नेहमि प्रमाणे रात्री भरत दिवे कुटुंबासोबत झोपले होते.अचानक पणे सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी पहाटे च्या दरम्यान चार अनोळखी अधन्यात नराधमांनी भरत दिवे ह्यांच्या लहान मुलीला झोपेतून उचलून नेली.मुलीच्या आरडा ओरडाणे भरत दिवे झोपेतून उठून मुलीच्या मदतीला धावले.त्या दरम्यान आरोपींनी भरत दिवे ह्याना जे भेटेल त्याच्याणे मारण्याचे काम केले.आरडा ओरडा आयकुण मुलीची आई देखील मदतीला धावून गेली.त्या वेळी आरोपींनच्या हातातून मुलीणे पळ काढला आणि आई वडिलांना वाचवण्या करीता मदतीला शेजाऱ्यांना बोलावण्याकरती दरवखजा ठोकला.शेजाऱ्यांच्या मदतीने त्यावेळी आदिवासी कातकरी कुटुंबाचे जिव वाचले.पाच एप्रील रोजी सोमवारचा दिवस उंगवला तसेच दिवस मावळला पुन्हा मंगळवार दिनांक सहा एप्रिल रोजी भरत गोविंद दिवे ह्याना झालेल्या मारहाणीमुळे त्यांचे निधन झाले. हि घटना काही लोकांनी वाॅटसप द्वारे वायरल केली.हि माहिती लालवट्याच्या कार्यकर्त्यांना कळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि ह्या बाबत संपूर्ण माहिती कुसुम भरत दिवे व त्यांच्या नातेवाईक तसेच शेजाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.ह्या बाबत अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन येथे कलम ३०२,३०४,३४ नुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु ह्या प्रकर्णात मयत.व्यक्ती भरत दिवे हे आदिवासी कातकरी समाजातील असल्याणे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) व पांच वर्षांच्या अधंन्यान मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोस्को ह्या कायद्यानुसार गुन्हा नोंद करून कडक कारवाई करण्यात यावी.म्हणुन लाल बावट्याचे कार्यकर्ते काॅ.शेरू वाघ निर्मला चौधरी पुनम यादव व इतर कार्यकर्त्यांनी अर्नाळा पोलिस स्टेशन येथे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.