
पालघर दि.9 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,डहाणू यांच्या मार्फत दि 9 ऑगस्ट पासून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सदर गौरव सप्ताह दि.9 ऑगस्ट 2021 ते दि.15 ऑगस्ट 2021 या कालावधीत राबविण्यात येतआहे.
सप्ताह कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी डहाणूचे आमदार . विनोद निकोले आणि प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर . आ.विनेाद निकोले व आशिमा मित्तल यांच्या हस्ते कातकरी मुलींना सायकल वाटप करण्यात आले. सायकल वाटपच्या कार्यक्रमानंतर सागर नाका, डहाणू येथे पारंपारिक आदिवासी नृत्याची मानवंदना देण्यात आली. त्यांनतर के.एल.पोंदा हायस्कूल येथे . विनोद निकोले, नगराध्यक्ष भरतभाई रजपूत, के. एल.पोंदा हायस्कूल चे ट्रस्टी श्री. सुनिल पोंदा आणि श्रीम.आशिमा मित्तल यांचे उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर के.एल. पोंदा हायस्कूल येथे मुलांची नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री स्टॉल यांचे उद्घाटन करण्यात आले.