

वसई (प्रतिनिधी) – नालासोपारा पश्चिममधील, निळेमोरे, आदिवासी पाड्यात २२ मे रोजी तीन व्यक्ती तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर घडलेल्या घटनास्थळी स्वतः खासदार राजेंद्र गावित यांनी आज जाऊन पाहणी केली आणि मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराचे सांत्वन केले, तसेच त्यांना खाजगी नोकरी देईन, असे विश्वासाचे आश्वासन दिले.
तसेच तेथील तलावांची साफसफाई लवकर करावी, असे निवेदन स्थानिक युवा कार्यकर्त्यांनी खासदार गावित यांना दिले, आयुक्त गंगाधरन डी यांना संपर्क करून तलावाची साफसफाई तात्काळ करावी असे गावित यांनी सांगितले.
सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, भाजप शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील, प्रवीण देवधर, निलेश राणे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
