खाते धारकांच्या खात्यातून अचानक रक्कम होते गायब ?

वसई – (जयंती पिलाने)
कोरोना काळामध्ये आर्थिक गोष्टीवर मात करून नागरिक आपआपल्या परीने जीवन जगत आहेत. अश्यातच सायबर गुन्ह्यात वाढ होत असून आता ग्राहकांच्या बँक खात्यावरच सायबर चोरांनी डल्ला मारायला सुरवात केली आहे. विविध बँकांच्या अनेक ग्राहकांच्या बँक खात्यातून अचानकपणे रोख रक्कम गायब होतात. कुणाच्या खात्यात अचानक पणे रक्कम जमा होतात. अश्या सायबर गुन्ह्याच्या घटना वसई विरार मध्ये सुरवात झाली आहे. एका वर्षात साधारणपणे अनेक घटनाची नोंद वसई विरार, पालघर मध्ये स्थानिक पोलीस स्टेशनला झाल्या आहेत. किती तरी ग्राहकांच्या खात्यातून अचानकपणे रक्कम ऑनलाईन द्वारे गायब होते. आणि जेव्हा ग्राहकांच्या फोनवर एसएमएस येतात तेव्हा ते बोलतात की आम्ही तर एवढे पैसे काढलेच नाही. तर आमचे पैसे काढले कोणी? आणि ग्राहकांनी बँकमध्ये जाऊन चौकशी केल्यावर कळते की तुम्ही ऑनलाईन ट्रांजेक्सशन केल आहे. अश्यात ग्राहकांना काय करावा हे सुचत नाही. चोरांनी आपला निशाणा योग साधलेला असतो. बँकेचे व्यव्हार करणाऱ्या नागरिकांचे इंटरनेट बँकिंग तपशील, मोबाईल क्रमांक व वन टाईम पासवर्ड ( ओटीपी) अशी ग्राहकांची माहिती गोळा करून हि चोरी केली जाते. चोर हे कोणत्या हि कंपनीचे नाव घेऊन कॉल करतात आणि काही कारण देऊन आपल्याला एसएमएस पाठवतात. आपल्या मोबाईलवर एक ओटीपी आला आहे सांगून तो ओटीपी मागून खात्यातून रक्कम काढली जाते. त्याच प्रमाणे लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल देऊ नये. कारण आपला नंबर हा बँक खात्यासी जोडला असल्यामुळे काही अँप किंवा कोणत्याही अँपचा वापर करुण सायबर चोरांना चोरी करण्यात एक मार्ग खुला करून देतो त्यामुळेच अगदी सहजपणे चोर चोरी करतात. त्यामुळे आपण सतर्क रहावे आणि असे काही प्रकरण घडल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करावे जेणे करून सायबर क्राईम करणाऱ्याला आळा बसेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *