सध्या कोरोना विषाणू मुळे जगभर हाहाकार मजला असताना भारताला आवश्यक अशी २५००० किलो वजन भरेल एव्हढी औषधे आणि PPE kits Shanghai varun घेऊन परवा सकाळी एक विशेष एअर इंडिया चे बोईंग ७७७ विमान मुंबई मध्ये उतरले.

आपल्या शाळेच्या १९९९ SSC बॅच चा विद्यार्थी असलेला मराठमोळा वसईकर कॅप्टन मंदार हळबे याने आपला जीव धोक्यात घालून आपल्या देशासाठी या विमानाचे सारथ्य केले आणि आपल्या देशवासीयांना उपयुक्त अशी औषधे आणि PPE KITS घेऊन आला

मंदार सध्या कामाच्या वेळा कधीही असतात म्हणून एअर इंडिया च्या कॉलनी मध्ये अंधेरी ला रहातो पण त्याचे आई बाबा पापडी ला राहतात आणि मंदार नियमित वसई ला येऊन जाऊन असतो .

या बातमीत मंदार चे नाव नाही कारण त्याच्या सर्व्हिस रुल्स प्रमाणे पायलट ना माध्यमांशी बोलता येत नाही .त्याला विचारले असता त्याने विनम्रपणे आपण विशेष काही केले नाही फक्त आपली duty केली असे सांगितले .मंदार ला आपल्या तर्फे मानाचा सलाम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *