नालासोपाऱा ता.25 (प्रतिनिधी) नालासोपाऱा शहर हे या महापालिका क्षेत्रातील सर्वार्थाने मोठे शहर आहे.
सर्वाधिक लोकसंख्या अधिक मालमत्ता. सर्वाधिक महसूल आणि अधिक लोकप्रतिनिधी.याच नालासोपाऱ्यात आहेत.
वॉर्ड अनेक आणि अनेक नगरसेवक या शहरात आहेत.
अर्थातच समस्या सुद्धा याच शहराच्या सर्वाधिक आहेत.
या सर्व परिस्थितीशी सामना करत गेली काही वर्षे या भागाचे नेतृत्व आम.हितेंद्र ठाकूर आणि आम.क्षितीज ठाकूर हे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन यशस्वीपणे करीत आहेत.जगात कुठेही नसेल असा हा नालासोपाऱा मतदासंघ आहे.जवळजवळ मिनी इंडियाच.
नाव नालासोपाऱा शहर.आधी होत्या पाच ग्रामपंचायती.
त्यात नाळा ही ग्रामपंचायत नव्हती. सोपारा गावाजवळील मोठे गाव नाळा. रेल्वे स्थानकाजवळ गाव होते ते निळेमोरे. मात्र त्यातही निळे हे गाव वेगळे आणि मोरे हे गाव वेगळे होते.वास्तविक पाहता या रेल्वे स्थानकाला ” निळे सोपारा “असे नाव असायला हवे होते.१९६१ ला या भागाची लोकसंख्या जेमतेम ५ हजार असावी.१९७१ ला ती पाचपट वाढून २५ हजारांवर गेली असेल.१९८१ ती ६७ हजार होती.याच लोकसंख्येच्या आधारे पुढे १९९० ला नालासोपाऱा नगरपरिषद अस्तित्वात आली.शासनाची ही घिसाडघाई या नव्या शहराला त्रासदायक ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *