
नियोजनशुन्य व बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे वसई आय प्रभागातील अनेक परिसर आज सलग तीन दिवस पाणी अन वीज सेवांपासुन वंचित – श्री. तस्नीफ नूर शेख , (भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष)

इलेक्शन काळात शिट्टी फुकत खोट्या विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्यांची एकहाती सत्ता असणारी वविशमनपा ची कागदावर दिसणारी आपात्कालीन यंत्रणा जमिनीवरुन गायब असल्याने जनतेत प्रचंड नाराजी असुन माजी नगरसेवक नाॅट रिचेबल आहेत.
वाॅर्ड क्र. १०८ मधे आनंदी भवानी मंदिरापासून ते थेट रानगाव रोड पर्यंत परिसरातील स्थानिक वसईकर जनता सलग चार दिवस अंधारात असुन अजुनही लाईटचे खांब घरांवर कोसळलेल्या स्थितीतच आहेत.
जामदार आळी येथे तर चक्क नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्यात आला परंतु सुदैवाने तेथील जागृत नागरिकांमुळे शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे होणारी जीवित हानी टळली.
केंद्र व राज्य सरकार कडुन पायाभूत सुविधांकरिता उपलब्ध निधी लाटणे, मालमत्ता करात वाढ करणे अन संकटकाळी जनतेला वाऱ्यावर सोडणे हेच वविशमनपा चे आद्यकर्तव्य ??
२० वर्षांत हरित व संपन्न वसई तालुक्याचे नियोजनशुन्य काँक्रिटीकरण, वसई विरार महानगरपालिकेचा भोंगळ कारभारामुळे जनता त्रस्त !