
एक वेळ अशी होती, की संपूर्ण वसई तालुक्यात वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पुरेसे पाणी मिळत नव्हते.माझी जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहे. ही गोष्ट लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या लक्षात आली. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे राज्य होते. या सरकारला बहुमतासाठी आप्पांचा पाठींबा होता.राज्य मंत्रीमंडळात मंत्री, किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्ष पद आप्पांना देण्याची तत्कालीन सरकारची होती. परंतु आप्पांनी जनतेचे हित जपले. चालून आलेली मंत्रीपदाची खुर्ची नाकारली. आप्पांच्या ठिकाणी दुसरा कुणी असता तर तत्काळ मंत्रिपदाची झुल अंगावर घेतली असती. पण मंत्रीपदाच्या खुर्चीच्या मोहात न पडता आप्पांनी सडेतोड सांगितले की मला जर काय दयायचेच असेल तर माझ्या जनतेला पाणी द्या. या प्रयत्नातूनच आज संपूर्ण वसई तालुक्याला जे पाणी मिळत आहे तो सूर्या धरणाचा प्रकल्प उभा राहिला. वसई, विरार, नालासोपारा मधील जनतेला पाणी मिळाले. म्हणूनच आमचा नेता पाणीदार आहे. आमचा नेताच असा आहे . की आज आप्पांचे नेतृत्व विविध पक्षातील अनेक नेते मान्य करतात.
आप्पांनी सर्वच आघाड्यांवर आपल्या नेतृत्व गुणांमुळे छाप पाडली. १९८८ साली राजकारणात सक्रिय झाल्यावर ,१९९० साली ते प्रथम आमदार झाले. आप्पांनी वसई तालुक्यात मोठमोठया शैक्षणिक संस्था , वैधकिय संस्था उभारल्या. विरार मध्ये बिल गेट्स सारख्या धनाढ्य व्यक्तीला त्याचप्रमाणे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनाही विरार मध्ये आणले. महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने अनेक क्रीडापटू, सेलिब्रेटी वसई, विरार मध्ये हजेरी लावतात. कारण आमच्या आप्पांची लोकप्रियताच तशी आहे.
दरवर्षी वसई कला व क्रीडा महोत्सव, साहित्य संमेलन, कीर्तन महोत्सव, नाट्य संमेलन त्यांचा फार मोठा वाटा आहे. कोरोनाच्या काळात आप्पानी कोरोना बाधित रुग्णांना खूप मोठा आधार दिला. आपल्या विवा कॉलेज त्यांनी कोविड सेंटर म्हणून वापरण्यास उपलब्ध करून दिले. इतकेच काय तर ज्या नागरिकांना जेवणाची भ्रांत होती अशा नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची सोय करून दिली. सर्व कार्यकर्त्यांना शिस्तबद्ध पध्दतीने सेवा करण्याचा आदेश त्यांनी दिला. आपल्या कार्यकर्त्यांच्या घरचे दुःख ते आपले दुःख मानणारा आमचा नेता आहे. म्हणूनच आप्पा नेहमीच पहिला मान आपल्या कार्यकर्त्यांना देतात. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा सारखा नेता मिळाला.
आज आमच्या आप्पांचा ६० वा वाढदिवस आहे. आमच्या आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आई जीवदानी मातेला एकच सांगणे आहे की आमच्या आप्पांना निरोगी आणि उदंड आयुष्य दे ! आणि जनतेचे प्रश्न सोडविण्याची ताकद दे !