ऑन ड्युटी पोलिसांची आरोग्य तपासणी सुरू.

वसई – शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढतच जात असून अजूनही नागरीक संचारबंदी चे नियम धाब्यावर बसवून स्वैराचार करत असल्याचे आढळून येत आहे. अशातच आपला पोलिस बांधव या काळात अहोरात्र कर्तव्यावर असून त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचे आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी निदर्शनास आणून दिले, त्यासंबंधीत वविमनपा तर्फे फिरत्या दवाखाना ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली होती. 

रुग्णमित्राच्या मागणीला डॉ सुनील रणाईत व डॉ गोविंद पाठारे (वसई तालुका आयुर्वेदिक ग्रॅज्युएट वेल्फेअर असो) तसेच डॉ सौ चाफेकर (आय एम ए) यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व ऑनड्युटी पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यासाठी उपाययोजना केली. गेल्या 2 दिवसात 120हुन अधिक पोलिसांची तपासणी केली व औषध वितरण केले. प्रायोगिक तत्त्वावर वसईत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून लवकरच नालासोपारा, विरार येथील ऑनड्युटी पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यासाठी फिरत्या दवाखाना ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. पं. हृषीकेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वसई चे सदस्य श्री कुलदीप मलिक व श्री प्रजित  पाटील सदर उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *