नालासोपारा – कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत असताना रक्तपेढीतील रक्तटंचाई होत असल्याने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमची वसई ने रक्तदान शिबीर 31मार्च रोजी भरविले होते. लॉकडाऊनमधे रक्तदान शिबीर भरविण्याकरीता रुग्णमित्राने आवाहन केले व त्यास भरघोस प्रतिसाद लाभला.

जस जसे लाकडाउन वाढत चालले तस तसे पुन्हा रक्तटंचाई भासू लागली असता पून्हा रक्ततुटवडा जाणवत असल्याचे आढळून आले म्हणून आमची वसई च्या माध्यमातून “रक्तदान महाअभियान” उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विभागातील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्या विभागातील दहा रक्तदात्यांचा समूह करून त्यांना नजीकच्या रक्तपेढीत रक्तदान करायला उद्युक्त करावे व रक्तटंचाई वर मात करावी. या कोरोना प्रादुर्भाव काळात आपण दहा-दहा स्वैच्छिक रक्तदात्यांचे गट तयार केले तर नक्कीच ही आरोग्यासाठी हितकारक बाब ठरेल. अक्षय पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महादान करुन उपक्रमाला सुरुवात केली. मित्राचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्याचा वेगळा पायंडा अक्षय च्या मित्रांनी पाडला या बद्दल आमची वसई चे अध्यक्ष श्री हृषिकेश वैद्य यांनी कौतुक केले. हा उपक्रम महाराष्ट्रातील इतरही तालुक्यात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *