वार्ताहर – महाराष्ट्रात रक्तटंचाई जाणवत असल्याने वसई विरार मधे देखील रक्ताची उपलब्धता अत्यंत तुटपुंजी असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने रक्तदान महोत्सव साजरा करण्यात आला. आमची वसई व म्हाडा वसाहतीने देखील दि २७ डिसेंबर रोजी म्हाडा वसाहत 3 मध्ये आमची वसई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात केले होते.

 आमची वसई ची युवा सदस्या कु साईली गणेश वाघ हिने तिचा अठरावा वाढदिवस तिने रक्तदान करून साजरा केला. डोंगर पाडा,विरार येथील सदगृहस्थ श्री हेमंत गावड यांनी त्यांच्या भाचीच्या लग्नाचं औचित्य साधत रक्तदान केले. वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी रक्तदान केले. मराठा उद्योजक लॉबी चे स्वयंसेवक यांनी रक्तदान शिबीरास सक्रिय सहभाग घेतला. बविआ नगरसेविक हार्दीक राऊत, शिवसेनेचे दिलीप पिंपळे यांची उपस्थिती शिबीरास लाभली. रक्तदान शिबीराचे औचित्य साधून श्री विनोद साडविलकर (रुग्णमित्र) व श्री महेंद्र भास्कर (सामाजिक कार्यकर्ते) यांनी रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांची नियुक्ती महाराष्ट्र स्तरावर कार्यरत असलेल्या "परिवहन मित्र सामाजिक प्रतिष्ठान" च्या वैद्यकीय कक्ष प्रमुख पदी केली व महाराष्ट्र टू व्हीलर युजर्स असोसिएशन चे येत्या वर्षाची दिनदर्शिकाच वितरण केले. रक्तदात्यांना विजय पाटील फाऊंडेशन तर्फे सुरक्षा किट तसेच मराठा उद्योजक लॉबी तर्फे दिनदर्शिका देण्यात आले. 

 साथिया ट्रस्ट रक्तपेढी चे चेअरमन श्री विजय महाजन यांनी उपस्थित शिबीर आयोजकांना रक्तदानाच महत्व, आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे याबाबत जनजागृती केली. सौ दिपिका मोंडकर (प्रतिनीधी, म्हाडा वसाहत व ईतर सन्माननीय सदस्य), शैलेश मराठे (सह्याद्री संस्कृती टुरिझम), मयूर ठाकूर (आमची वसई सदस्य), प्रथमेश सुर्वे (युवा कार्यकर्ता) यांनी शिबीराकरीता अथक परिश्रम घेतले व शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 80 रक्तदात्यांनी उत्सुर्फपणे प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *