
दि. १७ मे २०१९. केळवे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लाँकडाऊनचा आढावा घेण्यासाठी माननिय आमदार श्रीनिवास वनगा ह्यानी काल केळवा गावाला भेट दिली.
ह्या भेटी दरम्यान गावातील दिव्यांगाची भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि गरजूंना किराणा सामानाचे वाटप केले.
दरम्यान आमदारांनी केळव्यातील मान्सुनपुर्व कामांचा आढावा घेतला आणि सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.
ह्या भेटी दरम्यान आमदारांनी केळवा येथिल शिवसेना शाखेला ही भेट दिली तसेच लाँकडाऊनच्या काळात केळवा गावच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या स्वयंसेवकांची भेट घेऊन त्यांची विचारपुस केली व त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले यावेळी शिवसेना शाखा प्रमुख तुषार पाटील, विभाग प्रमुख उमेश पालेकर, उपसरपंच सदानंद राऊत,सदस्या प्रियांका पाटील, माजी उपसरपंच प्रमोद पाटील ईत्यादी मंडळी उपस्थित होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केळवे गावात घेतलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
कोरोनाच्या संकटामधे राज्य सरकार जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे असून योग्य त्या उपाययोजना आपल्या विभागात वेळच्या वेळी करण्यात येतील असे प्रतिपादन आमदारांनी केले.