(स्नेहा जावळे नायगाव) आमदार मा. हितेंद्र ठाकुरजींनी महानगर पालिकेला पावसाळ्यापुर्वी नायगाव पुर्वच्या संरक्षक भिंतीचे काम तत्काळ पुर्ण करण्याचे आदेश आजच्या मिटिंग मध्ये दिले .
नायगाव पुर्व वाॅर्ड क्र. १०५ मध्ये गणेश नगर व आसपासच्या भागात प्रामुख्याने पावसाळ्या खाडीचे व पावसाच्या पाण्यामुळे या भागात पाण्याचे साम्राज्य निर्णाण होत होते . काही लोकांच्या घरातही पाणी यायचे यावर आता या पावसाळ्यात लोकांना दिलासा मिळेल ; कारण आमदार मा. हितेंद्र ठाकुरांनी या भागात पाणी येणे रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजुर करुन दिला आहे .
या कामासाठी १,१०,००७१७ रु चा निधी आर सी सी ची म्हणजे बोली भाषेत संरक्षक भिंत बांधण्यासाठी आजच्या मिटिंग मध्ये आमदारांनी सांगितले .
हि भिंत नायगाव ब्रिज ते गणेशनगरचा भागापर्यंत बांधण्यात येईल .
या संरक्षक भिंतीची मागणी नायगाव पुर्वचे सभापती/ नगरसेवक मा. कन्हैया भोईरजी यांनी केली होती . व या कामासाठी सतत पाठपुरावा नायगाव पुर्वचे काॅलनी विभाग अध्यक्ष श्री. धरेंद्र कुलकर्णीजींनी केला होता . आज सर्वांच्या कामाला यश मिळाले व यावर्षी पावसाच्या व खाडीच्या पाण्याचा त्रास होणार नाही हे ऐकुन नायगाव पुर्वच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व नागरिक मा. आमदार हितेंद्र ठाकुरजींचे खुप आभारी आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *