
वर्ष- सातवे
तुम्हा सगळ्यांना हे कळवण्यात आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आम्ही सारे,वसई आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आयोजित कै. निरज जड स्मृत प्रित्यर्थ मराठी आणि हिंदी एकपात्री, आणि स्किट (नाटूकली) अभिनय स्पर्धा- 2019* या सातत्यपूर्ण स्पर्धेचं आम्ही आयोजन करीत आहोत..!
स्पर्धेचं हे सातवं वर्ष, या स्पर्धेसाठी जरी प्रवेश विनामुल्य असला तरी स्पर्धकांनी अनामत रक्कम भरून आपले स्थान निश्चीत करावे.
एकपात्रीसाठी 50/- रू. अनामत रक्कम आहे, स्किट साठी.100/- रू. अनामत रक्कम आहे. स्पर्धकांच्या सादरीकरणानंतर ही अनामत रक्कम त्यांना परत देण्यात येईल. स्पर्धकांनी 24 ऑगस्ट सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत आपले नाव अनामत रक्कम भरून निश्चीत करावे.
अनामत रक्कम गुगल पे सुद्धा करू शकता.
टीप :- फक्त 30 एकपात्री स्पर्धक आणि 10 स्किट संस्था यांनाच प्रवेश दिला जाईल. त्यामुळे अनामत रक्कम भरून नाव नोंदणी करून घ्यावी. (एक कलाकार एकाच स्किट मध्ये सहभागी होऊ शकतो.)
एकपात्री अभिनय
1 वेळ : कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 7 मिनिटे.
2 भाषा : मराठी किंवा हिंदी.
3 वयोगट : नाही. (खुलागटआम्ही सारे,वसई* आणि *अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आयोजित कै. निरज जड स्मृति प्रित्यर्थ मराठी आणि हिंदी एकपात्री, आणि स्किट (नाटूकली) अभिनय स्पर्धा- 2019* )
4 संहिता : स्व:लिखित किंवा नाट्यप्रवेश.(संहिता सोबत घेऊन येणे.)
5 संहितेत अश्लील भाषा अथवा राजकीय टीका टिपणी नसावी.
स्किट (नाटूकली,प्रहसन)
1 कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 10 मिनिटे.
2 भाषा : मराठी किंवा हिंदी.
3 वयोगट : नाही (खुलागट)
4 संहिता : स्व:लिखित किंवा नाट्यप्रवेश.(संहिता सोबत घेऊन येणे.)
5 संहितेत अश्लील भाषा अथवा राजकीय टीका टिपणी नसावी.
6 कलाकार : कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6.
पारितोषिके
1 एकपात्री साठी प्रथम, द्वितीय व तृतीय अनुक्रमे रू.1,500/-, 1,000/-, 750/- रोख आणि आकर्षक चषक तसेच प्रमाणपत्र.
2 स्किट साठी प्रथम, द्वितीय व तृतीय अनुक्रमे रू. 3,000/-, 2,000/-, 1,000/- रोख आणि आकर्षक चषक तसेच प्रमाणपत्र ही पारितोषिके देण्यात येतील.
ही स्पर्धा ह्या वर्षी युथ फेस्टिवल असल्या कारणाने दि. २५ ऑगस्ट २०१९ रोजी राजाणी सभागृह, वर्तक महाविद्यालय, वसई येथे सकाळी ९ ते दुपारी 4 या वेळेत घेतली जाणार आहे.
संपर्क:-
विनित :- 9763626419 / 9511899731
रोहन :- 9665170525
संदेश :- 9518748984
स्थळ :- अण्णासाहेब वर्तक कॉलेज वसई राजानी हॉल वसई स्टेशन जवळ वसई पश्चिम ..
