मराठा आरक्षणावरुन वाद रंगला
विरोधक राजकारण करुन दमला
ठाकरेंनी घेलतली पंतप्रधानांची भेट
अकरा मुद्यांसह दिल्ली गाठली थेट
पवार ,प्रशांत किशोर बैठक तिन तास
बैठकिला राजकीय खलबतांचा वास
राऊतांचे वक्तव्य वेळ मारण्याचा प्रयत्न
सरकार वाचवण्यासाठी किती हे यत्न
कोरोना व्हॅक्सीनेशन कधी चालु कधी बंद
पहिल्या पावसाने मुंबईची लाईफलाईन मंद
पवारांच्या तिन तासानी सर्वांना प्रश्न गहन
कोरोनाने तोट्यात आले राज्याचे परिवाहन
सर्वसामान्य पहिल्या, दुसऱ्या लाटेन मेला
केंद्रला मात्र मदतीचा पाझर नाही फुटला
शेती , शेतकरी पावसात वाहुन कर्जबाजारी
देहु-आळंदीला अजित पवारांच्या कृपेने वारी

कर्मविर स्नेहा जावळे यांची कविता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *