
पालघर दि. ११ :- शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे-१ यांचेकडील पत्र जा. क्र./प्राशिस/आरटीई ५२०/२०२१/१९२४, दि.०४/०६/२०२१ च्या पत्रानुसार सन २०२१-२२ च्या आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत दिनांक ०७/०४/२०२१ रोजी सोडत (लॉटरी) काढण्यात आलेली आहे. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दिनांक ११/०६/२०२० पासून शाळा स्तरावर राबविण्याचे नियोजित आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यामधील १४७६ बालकांना या प्रक्रिये अंतर्गत प्रवेशीय लाभ मिळालेला आहे. निवड झालेल्या १००% विद्यार्थ्यांना प्रवेश संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी वर नमूद पत्रातील मार्गदशक सुचनांच्या अधीन राहून सदर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
श्रीम. भारती कामडी, अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर, श्री. सिद्धाराम सालीमठ (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर व श्रीम. लता सानप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर “ पालघर जिल्ह्यातील सर्व आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या बाळकांच्या पालकांना आवाहन करतात की, सन २०२१-२२ च्या आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत दिनांक ०७/०४/२०२१ रोजी सोडत (लॉटरी) काढण्यात आलेली आहे. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दिनांक ११/०६/२०२० पासून शाळा स्तरावर राबविण्याचे नियोजित आहे. तरी पालकांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेवून दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्यावा.”