५४८३ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार सर्व माध्यमाच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यता (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये शाळाप्रवेश स्तरावर २५% जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद असून त्यानुसार पालघर जिल्ह्याकरिता २०.०२.२०२३ पासून पालकांसाठी आरटीई २५४ करीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरुवात होणार आहे. सदर प्रक्रीयेकरिता नर्सरी आणि पहिलीकरिता जिल्ह्यातील एकूण २६६ शाळा आहेत व त्यामध्ये एकूण ५४८३ जागांपैकी ५३८० जागा इयत्ता १ ली करीता व १०३ जागा नर्सरी करीता असल्याची माहिती शिक्षण विभाग मार्फत देण्यात आली आहे.तरी सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे उपाध्यक्ष तथा शिक्षण व वित्त समिती सभापती पंकज कोरे यांनी केले आहे.

दिनांक २०.०२.२०२३ पासून बालकांसाठी आरटीई २५% online अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे तसेच याबाबत काही अडचणी असल्यास आरटीई पात्र शाळा मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा. https://studcat.nabarashtra.gov.in/adam portal/user/login या लिंक वर अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा परिषद आणि उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती यांच्या मार्फत पालघर जिल्ह्यांतील सर्व पालकांना शिक्षण विभाग जिल्हा परिषद मार्फत आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *