रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच पर्यावरण प्रेमींचे आरे जंगल वाचावे म्हणून मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर "निषेध धरणे आंदोलन" करण्यात आहे. यावेळी समीर वर्तक यांच्यासह 30 ते 35 आंदोलकांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.
ऑक्टोबर 2019 मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली. दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हज़ारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करीत होते त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. त्यावेळी *एकनाथजी शिंदे हे महाविकास आघाडी सरकार मध्ये नगरविकास मंत्री होते* सरकारतर्फे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार श्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले. मुंबई व महाराष्ट्रातल्या पर्यावरणप्रेमी जनतेनी या निर्णयाचे स्वागत केले
परंतू आता नामदार श्री. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण करताबरोबरच आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली . या घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमी फार नाराज झाले आहेत. पर्यावरण व हवामान ढासळत असताना अश्या तुघलकी निर्णयाच्या विरोधात आणि आरेचे जंगल वाचावे म्हणून *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे हे *"निषेध धरणे आंदोलन"* करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री धनंजय पाटील, प्रदेश सरचिटणीस श्री अभिजित घफ, सौ वर्षा शिखरे, श्री अम्मार पटेल, प्रदेश सचिव श्री आमिर देशमुख, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे ठाणे शहर श्री मनोज डाकवे, ठाणे ग्रामीण श्री रामचंद्र जोशी, वसई विरार श्री डेरीक फुरताडो, कल्याण डोंबिवली सौ रीना खांडेकर, भिवंडी श्री नौशाद अन्सारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री दर्शन राऊत, श्री पवन भोईर आणि श्री अनिल जाधव उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्या किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री पराग पष्टे, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री महेश धानके, राष्ट्रीय फेरीवाला संघाचे महासचिव श्री मॅकेन्झी डाबरे, युवा संस्थेचे श्री राजू भिसे तसेच पर्यावरण विभागाचे अनेक कार्यकर्ते आणि असंख्य पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले होते.