
◆ खऱ्या कोरोनायोद्यांचा सत्कार; महिला राष्ट्राची खरी संपत्ती: हिना भट
◆ आशा सेविकांच्या समस्यांवर नक्की ठोस तोडगा काढणार: कामगार नेते अभिजीत राणे
◆ भाजपा कोरोनायोद्धा आशा सेविका सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!


वसई: भाजपा वसई-विरार कडून कोरोनाकाळात वसई तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या आशा सेविकांचा आज साडी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग, जम्मू काश्मीरच्या केंद्रीय खादी ग्रामोद्योग सदस्य (राज्यमंत्री दर्जा) डॉ. हिना भट, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन नाईक आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्रमुख उज्वला गायकवाड, नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अलमास खान, पूर्व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव, योगेंद्र चौबे, हरेंद्र पाटील, राजू म्हात्रे आदी पाहूणे कार्यक्रमास लाभले.
प्रमुख पाहुणे कृपाशंकर सिंग यांनी उपस्थितांना संबोधित करताना, आशा सेविकांचा सत्कार माझ्याहातून होणे हे माझे मी भाग्य समजतो, ह्या माता आपले व आपल्या परिवाराला धोक्यात घालून वसईकरांच्या सेवेसाठी घरोघरी जाऊन कोरोनाकाळात शासनाची मदत करत होत्या. आज जर कोरोना आटोक्यात आला आहे तर त्याचे संपूर्ण श्रेय हे आशा सेविकांना जाते. परंतू सरकारकडून ह्यांच्याकडे केले जाणारे दुर्लक्ष खेद देणार आहे असे यावेळी ते म्हणाले.
डॉ. हिना भट यांनी बोलताना, महिलांची एवढी संख्या बघून आनंद झाला. मी जम्मू काश्मीरवरून फक्त आणि फक्त तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी आली आहे. तुम्ही जे कठीण राष्ट्रासाठी उभे आहेत हे राष्ट्र कधी विसरणार नाही आजचा सत्कार म्हणजे भाजपा कडून आपली घेतल्याबद्दल मी उत्तम कुमार यांना शुभेच्छा देते असे यावेळी त्या म्हणाल्या.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोलताना, मी कामगारांचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे तुमचे दुःख मी समजू शकतो. तुम्हाला दिले जाणारे तुटपुंजे मानधन, सरकारचे दुर्लक्ष व अशा प्रतिकूल परिस्थितीही आपण जे काम करत आहात हे नक्कीच उल्लेखनीय आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करता येईल ते मी नक्की करणार एवढा आपणास विश्वास देतो असे यावेळी ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी बोलताना, हा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास मी खूप खूप शुभेच्छा देतो. भविष्यातही भाजपा कडून असे कार्यक्रम झाले पाहिजेत व ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
आयोजक उत्तम कुमार यांनी बोलताना सर्व पाहुण्यांचे आभार मानले व स्थानिक आमदार ज्यांनी सेवेत राहिले पाहिजे तेव्हा हे घरी बसून होते बविआ ची सर्व नेते क्वारान्टीन झाले होते.अशा वेळी ही माझे कार्यालय दररोज चालू होते व जेवढी सेवा करता येईल तेवढे काम कार्यालयातुन चालू होते. अशी टीका त्यांनी यावेळी स्थानिक सत्ताधारी पक्षावर केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन वसई रोड मंडळाचे अध्यक्ष रामनुजम यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश पांडे, विनेश नायर, कल्पेश चौहान, बाळा सावंत, श्रीकुमारी मोहन, ऋषी व्होराणी यांनी विशेष मेहनत घेतली.