प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयातील आस्थापना विभागाचे सहाय्यक आयुक्त रवी पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बेफाम भ्रष्टाचार चालविला आहे. कर्मचाऱ्यांना त्याच पदावर ठेवणे, मलईदार ठिकाणी बदली करणे याकरिता रवी पाटील लाच घेत असल्याचा आरोप होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयातील आस्थापना विभागाचे सहाय्यक आयुक्त रवी पाटील यांच्यावर बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करीत असल्याचे आरोप होत असून त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी व्हावी. महानगरपालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या या नियमानुसार होत नसून त्या बाबत सखोल चौकशी झाल्यास त्यामध्ये अनियमितता आढळते. अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी काम करीत असल्याचे दिसते. तर काही कर्मचाऱ्यांच्या इकडून तिकडे तिकडून इकडे अशा अंतर्गत बदल्या होताना दिसतात. काही कर्मचाऱ्यांच्या तर ६ महिन्यात बदल्या झाल्याचेही पहावयास मिळते. प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांमध्ये तर अत्यंत अनियमितता दिसून येते.
कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार व्हायला हव्यात. बदल्यांमध्ये होणारा भ्रष्टाचार ही चिंतेची बाब आहे. आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे. परंतु आयुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना नियम पायदळी तुडवतात. मग आस्थापना विभागाच्या सहाय्यक आयुक्त रवी पाटील यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा धरणार?
वसई विरार शहर महानगरपालिकेत होत असलेल्या बदल्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *