पालघर दि. ११ : विषाणूचा संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशामध्ये तसेच राज्यामध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पालघर जिल्हयामधील उद्योगधंदे व खाजगी आस्थापना बंद आहेत. तरी यासर्व उद्योगधंदे व खाजगी आस्थापनांच्या मालकांना सुचना देण्यात येत आहेत की, त्यांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कामगारांना व कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन अदा करावे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केले.

कोणाचीही वेतन कपात करु नये. तसेच सदरचे कामगार किंवा कर्मचारी ज्यांच्याकडे भाडयाने रहात आहेत, त्या घरमालकांना सुचना देण्यात येत आहेत की, सद्याच्या परीस्थितीमध्ये खाजगी आस्थापनेवरील कामगार व कर्मचाऱ्यांकडून त्यांना भाडे अदा करणेमध्ये वेळ किंवा उशिर झाल्यास त्यांना घराबाहेर काढू नये किंवा त्यांना भाडे अदा करणेबाबत बळजबरी करु नये. अशी सूचनाहि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केली.
याबाबत कोणाच्या तक्रारी असल्यास संबधित तहसील कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रुम दूरध्वनी क्रमांक ०२५२५-२५२५२० व ०२५२५ २९७४७४ यावर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ. कैलास शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *