

नालासोपारा(एस.रेहमान शेख)
जन आशिर्वाद यात्रा करत आदित्य ठाकरेंचा
विजय संकल्प मेळावा आज नालासोपारात संपन्न झाला . यावेळी आदित्य म्हणाले ही जन आशिर्वाद यात्रा मागच्या लोकसभा निवडणुकीचा भाग आहे कारण त्या विजयामुळे मी आलोय आणि या नंतरही विकासाच्या कामाचा शुभारंभ करायला मी नेहमी येत राहणार आहे .
मागच्या निवडणुकीत आमची घोषणा होती ” इलाका तुम्हारा, धमाका हमारा ” पण लोकसभा निवडणुकी नंतर अस आहे, ” इलाका भी हमारा , और धमाका भी हमारा ” असे वक्तव्य आदित्यचे होताच लोकांनी जल्लोश केला व घोषणाबाजी करत ठाकरेंजी व शिवसेनेचा जयजयकार केला .
अदित्य म्हणाले इथली वर्षानुवर्षे चालेली गुंडागर्दी आम्ही या निवडणुकीत मोडुन काढणार आणि जनतेनी ठरवायच की ज्यांनी मुंबईतली गुंडागर्दी मोडुन काढली ते तुम्हाला इथे पाहीजेत का तेही जनतेनी ठरवायच कारण येताना खुप ठिकानी बॅनर लावलीत ” चोर की पोलीस ” हे ही तुम्ही ठरवा कारण ज्यानी बॅनर लावलीत त्यानी खुप विचार करुन लावलीत असा टोलाही अदित्यनी बोलतांना केला .
आज नालासोपाराच्या या विजय संकल्प मेळाव्यात
इतर राजकीय संघटना यांनी पक्ष प्रवेश केला.
या कार्यक्रमाला नव्याने शिवसेना पक्ष प्रवेश केलेले मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब आमदार रविंद्रजी फाटक साहेब विजय पाटील , प्रदिप शर्मा , व खासदार राजेन्द्र गावितही उपस्थित होते .